कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ झालेच पाहिजे; रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन
रत्नागिरी : कोकणसाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ झाले पाहिजे, या मागणीसाठी मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन या मागणीची दखल न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिला. रत्नागिरी तालुका मनसेच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस सुनिल साळवी, महिला शहर अध्यक्षा अंजली सावंत, महिला तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, चिपळूण शहर अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर, यांच्यासह अनेक मनसेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारकडून या मागणी संदर्भात सकारात्मक पावले उचलली न गेल्यास पुढील आंदोलन मनसे स्टाईल असेल असा इशारा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिला.