रत्नागिरी तालुक्यात 68 टक्के मतदान; सत्कोंडी येथे मशीन पडले बंद
रत्नागिरी : तालुक्यात 25 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सुमारे 68 टक्के मतदान झाले. मतदानासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाल्याने याचा फायदा कोणाला होणार याकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील चार गावांमध्ये सरपंचपदासह सदस्यही बिनविरोध झाले तर एकूण सहा सरपंच बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 25 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या होत्या. दुपारी दीडपर्यंत 49.65 टक्के मतदान नोंदवले गेले होते. मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात सत्कोंडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधील मशिन बंद पडले होते. ते तातडीने बदलून मतदान सुरु करण्यात आले.