रत्नागिरी जिल्ह्यात 163 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 67 टक्क्यांहून अधिक मतदान

रत्नागिरी : जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे 67 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. रविवारी मतदान प्रक्रियेनंतर मंगळवार दि. 20 डिसेंबर रोजी प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशाकीय तयारी पूर्ण झाली आहे. चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 155 सरपंच व 666 सदस्यांसाठी ही निवडणुक होत आहे. यात सरपंचपदासाठी 406 तर सदस्यांसाठी 1206 उमेदवार रिंगणात आहेत.    या पूूर्वी 67 सरपंच व 1100 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मतदानासाठी मोठी गर्दी दिसून आली. पहिल्या चार तासात पस्तीस टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मंडणगडमध्ये 63.17 टक्के, दापोलीत 59.98 टक्के तर खेडमध्ये 60.94 टक्के, चिपळूणमध्ये 58.48, गुहागरमध्ये 57.66, संगमेश्वरमध्ये 51.68, रत्नागिरीत 58.07, लांजात 58.56 तर राजापूरमध्ये 52.87 टक्के इतके मतदान दुपारी साडेतीनपयर्र्त नोंदवले गेले होते. जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 440 मतदारांनी दुपारी साडेतीनपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. 1 लाख 12 हजार 624 महिला मतदारांपैकी 63 हजार 328 मतदारांनी मतदान केले होते तर 1 लाख 2 हजार 775 पुरुष मतदारांपैकी 60 हजार 113 पुरुषांनी मतदानाचा हक्क दुपारी 3.30पर्यंत बजावला होता.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button