
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे पत्नीवर सुर्याने वार करणार्या पतीवर गुन्हा दाखल
पतीने पत्नीवर सुर्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे घडली होती. या प्रकरणी त्या पतीवर चिपळूण पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश शिवराम माने (रा. आंबडस) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पत्नी जयश्री गणेश माने (३६, मार्गताम्हाने) यांनी दिली. शिमगोत्सव असल्याने जयश्री माने या आई पद्मावती देवी मंदिरात ओटी भरण्यासाठी आल्या असता मंदिराच्या पुढे कच्च्या रस्त्यावर त्यांचा पती गणेश माने आला व त्याने मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून जयश्री यांना थांबवले. यावेळी गणेश याने अचानकक जयश्री यांचे केस पकडून त्यांच्या हातात असलेल्या सुर्याने त्यांच्या दोन्ही हातावर खोलवर वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी जयश्री माने यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पती गणेश माने याच्यावर गुन्हा दाखलल केला आहे.www.konkantoday.com