
चिपळूण तालुक्यात 65 टक्के मतदान
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि.18 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुमारे 65 टक्के मतदान झाले. दुपारी 3:30 पर्यंत 58.48 टक्के मतदान झाले होते. एकूण 14 हजार 72 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 7 हजार 167 पुरुष तर 6 हजार 05 महिलांचा सहभाग होता.