
आजाराला कंटाळून काळबादेवी येथे गळफासाने आत्महत्या
रत्नागिरी : यकृताच्या आजाराला कंटाळून तालुक्यातील काळबादेवी-शेट्येवाडी येथे वृद्धाने फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील शिवराम शेट्ये (वय 65, रा. काळबादेवी – शेट्येवाडी ) असे गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. सुनील शेट्ये एकटेच असल्याने ते काळबादेवी येथील आपल्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आले होते. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.