कोल्हापूर खंडपीठाचा विषय मार्गी लावू : मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
रत्नागिरी : अधिवेशन संपताच मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठाचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्ट मंडळाला दिले. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतचे निवेदन यावेळी खंडपीठ कृती समितीच्या शिष्ट मंडळातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आले. या खंडपीठ कृती समिती शिष्ट मंडळातर्फे अॅड. गिरीश खडके (अध्यक्ष- खंडपीठ कृती समिती) , अॅड. विजयकुमार ताटे – देशमुख (सचिव – खंडपीठ कृती समिती), अॅड. संग्राम देसाई (विद्यमान सदस्य व माजी उपाध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा), अॅड. महादेवराव आडगुळे (माजी अध्यक्ष -बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा), अॅड. शिवाजीराव मर्ढेकर (अध्यक्ष -सातारा बार असो.), अॅड. प्रशांत चिटणीस, अॅड. नारायण भांदिगरे, अॅड. प्रदीप जाधव (अध्यक्ष- सांगली बार असो.), अॅड. भाऊसाहेब पोवार (माजी अध्यक्ष सांगली बार असो.) अॅड. भगवानराव मुळे (अध्यक्ष -पंढपूर बार असो.), अॅड. दिलीप धारिया (अध्यक्ष- रत्नागिरी बार असो.), अॅड. मधुकर नाईकनवरे, अॅड. राहुल बोडके, अॅड. प्रताप हारुगडे – सांगली, अॅड. सचिन पाटील, अॅड. सुभाष संकपाळ उपस्थित होते.