मुख्यमंत्री शिंदे घेणार श्री देव भैरीचे दर्शन
रत्नागिरी : एकनाथ शिंदे हे मुख्यमंंत्री झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा आशीर्वाद घेणार आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्याहस्ते होणार आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी चरणी समस्त रत्नागिरीकरांसह राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे भक्तीभावाने चरणी माथा टेकवत असतात. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे प्रथमच रत्नागिरी दौर्यावर येत असून कोट्यवधीच्या विकासाकामांचा व विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी ना. शिंदे हे श्री देव भैरीचे दर्शन घेणार आहेत.