
चिपळुणात रात्रवस्तीच्या एसटी चालकास मारहाण
चिपळूण : वीर-चिपळूण गाडी रात्र वस्तीसाठी वीर येथे गेली असता गाडी उभी करण्याच्या वादातून एसटी चालकास तिघांनी मारहाण केली.
नेहमीच्या पार्किंग जागेवर इतर वाहने असल्याने त्याला बाजूला नेण्यास सांगितले असता याच वादातून तिघांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली. या प्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रदीप तुकाराम साळवी (वय ५८), पूजन प्रदीप साळवी (वय वय ३१), चंद्रकांत तुकाराम साळवी (वय ३४, सर्व गुहागर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.