अलोरे -शिरगाव पोलिस ठाण्यासमोर पोलिसांनी पकडली बेकायदा गोवंश वाहतूक करणारी गाडी

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावर अलोरे -शिरगाव पोलिस ठाण्यासमोर गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली आहे.  ही कारवाई दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. रघुनाथ बाबू ठसाळे (रा. धामेली, ता. चिपळूण), दयानंद दत्ताराम जाधव ( कालुस्ते, ता. चिपळूण) अशी नावे आहेत. भगवान कोकरे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता दोन बैल आढळून आले. मात्र, रघुनाथ ठसाळे यांनी आपल्याकडे गोवंश वाहतुकीचा परवाना असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी बैलांची वैद्यकीय तपासणी केली आहे का? असे विचारले असता त्यांनी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. कत्तलीकरिता नेत असल्याचे या फिर्यादीत कोकरे यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button