
हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणी बाबत साशंकता
रत्नागिरी जिल्हा सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पंधरा डिसेंबर पासून जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांपासून अधिकारी व अभ्यासगता पर्यंत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होणार की नाही याविषयी साशंकता आहे गेल्या वेळीही करोनाच्या काळात व त्यानंतर हेल्मेट सक्ती होऊन मोठ्या प्रमाणावर दंडाची वसुली झाली होती दंडाच्या ही रकमा मोठी असल्याने नागरिकांच्यात असंतोष होता रत्नागिरी शहरातील रस्ते मुळातच लहान असल्याने दुचाकी वाहनाच्या वेगावर मुळातच मर्यादा आहेत त्यामुळे हेल्मेट संभाळत प्रवास करणे दुचाकी चालकांना अडचणीचे ठरत होते जे वेगाचे नियम मोडतील त्यांच्यावर जरूर कारवाई करावी तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती करावी पण रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती शिथिल करावी अशी मागणी त्यावेळी मंत्री उदय सामंत यांच्याकडे नागरिकांनी केल्यानंतर त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन ही हेल्मेट सक्ती स्थगित केली होती आताजिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर केल्याने परत एकदा नागरिक व काही संघटना पालकमंत्री उदय सामंत यांचे कडे धाव घेण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्री उदय सामंत या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे
www.konkantoday.com