चिपळूण परशुराम सवत कडा येथे सांबराची शिंगे बाळगणाऱ्या दोन जणांना अटक
रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चिपळूण येथील सवतकडा येथे वाहनांची तपासणी करून सांबराची शिंगे बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे तसेच शिंगे ही जप्त केली आहेत
स्थानिक गुन्हा शाखेला चिपळूण येथे काही जण वन्य प्राण्यांचे अवयव विक्रीसाठी आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्याच्या मदतीने मुंबई गोवा हायवेवर सापळा रचला होता त्याचाच एक भाग म्हणून काही वाहनांची तपासणी सुरू केली होती त्यामध्ये एका पर जिल्ह्यातील संशयित गाड्यांमध्येतपासणी केली असता दोन वन्यजीवी सांबराची भरीव दोन शिंगे मिळून आले या कारवाई मध्ये दोन्ही जणांना ताब्यात घेण्यात आले असून चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गाडी व मुद्देमाल तब्येत घेण्यात आला असून त्याची किंमत दोन लाख रुपये आहे ही यशस्वी कारवाई जिल्हापोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा स्थानिक पुणे अन्वेषण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर पोलीस कर्मचारी श्री भागणे श्री झोरे श्री डोमणे श्री पालकर श्री कांबळे श्री पाटील तसेच वनरक्षक वन अधिकारी कृष्णा इरमाले आदींनी यशस्वी पार पाडली
www.konkantoday.com