
शुद्ध म्हणून पुरविण्यात येणारे जारमधील पाणी अशुद्ध,
चिपळुणातील प्रकारचिपळूण येथे जारमधून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे पुढे आले आहे. गोवळकोट रोड येथील एका महिलेला अतिसाराचा त्रास झाल्याने तिने नगर परिषदेकडे या प्रकल्पाची तक्रार केली. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या तपासणीतील अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. उघड्या साठवण टाकीत मोठ्या प्रमाणात विष्ठा असल्याचे दिसून आले. तसेच अस्वच्छ विहिरीतून पाण्याची उचल होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यासह प्रकल्पासाठी विविध विभागाच्या परवानग्या घेण्याबाबत संबंधिताला नोटीस धाडण्यात आली आहे.गेल्या काही वर्षापासून स्वच्छ व गारेगार पाणी म्हणून जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
काही वर्षे मागे जाता या पाण्याचा केवळ समारंभासाठी वापर होत होता. मात्र आता घरगुती पिण्याच्या पाण्यासाठीही जारच घेतले जातात. दुकानदारांनीही आपल्या दुकानांमध्ये जार ठेवण्यास सुरूवात केली आहे. १८ लीटरचा हा जार ५० ते ६० रुपयांना मिळत असून १ जार आठ दिवसात संपवावा अशी अट आहे. हा पाणीपुरवठा करणारे शहरात २ हून अधिक प्रकल्प आहेत. दिवसाला हजारो लीटर पाण्याचा जारमधून नागरिकांना पुरवठा केला जातो. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.असे असताना अनेकदा काही नागरिक या पाण्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करतात.
मात्र पुराव्याअभवी याकडे कोणीही तितकेसे लक्ष देत नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी गोवळकोरोड येथील महिलेला अतिसाराचा त्रास झाला त्यामुळे ती एका रूग्णालयात काही दिवस उपचार घेत होती. यामळे तिची आरोग्य विभागाने चौकशी केली असता आपण कायम जारचे पाणी पित असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर जारचा पुरवठा करणार्या प्रकल्पाविरोधात नगर परिषदेकडे तक्रार केली. त्यानुसार आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव यांनी प्रकल्पाची तपासणी केली असता येथे असणारी साठवण टाकी उघडी व वरील भागात फुटलेली असल्याचे दिसून आले.www.konkantoday.com