हिंमत असेल तर मला तुरूंगात टाका. पण मी मरे पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच रहाणार- आमदार राजन साळवी
सिंधुदुर्ग जय शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना काही दिवसापूर्वी लाच लचपत खात्याने नोटीस दिल्यानंतर राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत खात्याने खात्याने नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे याबाबत आमदार साळवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
हिंमत असेल तर मला तुरूंगात टाका. पण मी मरे पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच रहाणार असल्याचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले. ते म्हणाले की, मला नोटीस का आली? हे मला अजून कळालेले नाही. ज्या राज्यात भाजप आणि त्यांचे सहकारी पक्षाचे सरकार आहे, त्या राज्यातील विरोधकांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून त्रास देण्याचे काम सुरू आहे. मी अशा कोणत्याही नोटीसला भीक घालत नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. जनतेसाठी अनेकवेळा तुरूंगात गेलोय त्यामुळे मला तुरूंगाची भीती नाही. हिंमत असेल तर मला तुरूंगात टाकून दाखवा असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. हे सर्व मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि राज्यातील सरकारने कारस्थान रचले आहे. पण मी अशा नोटीसांना घाबरणार नाही. माझ्या पाठीशी जनता आहे. मी संघर्ष करणार असे आमदार साळवी यांनी ठणकावले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर जी थाप दिली व शाबासकी दिली हिच माझी श्रीमंती आहे. माझ्या सोबत असलेले शिवसैनिक हिच माझी श्रीमंती असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.शनिवारी दुपारी मला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस आली. या नोटीसमध्ये 5 डिसेंबर रोजी चौकशीसाठी मला अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर रहाण्यास सांगितले. आज काल आणि आज सुट्टी आहे. अशावेळी मी लगेच उद्या सकाळी सर्व माहिती घेऊन अलिबागला पोहचू शकत नसल्याने वकिलांच्या मार्फत मी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
www.konkantoday.com