
लाडघर समुद्रकिनारी पुण्यातील तरुण पर्यटकांचा मृत्यू
पुणे येथून दापोली लाडघर येथे पर्यटनासाठी आलेल्या
तरुण पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतीवाडी, आळंदी रोड, पुणे येथील मयूर चिखलकर वय २७ हा पर्यटनासाठी दापोली लाड घर येथे आला होता पुणे येथील ऐकूण सतरा मित्र आज रविवारी सकाळी 8 वाजता पर्यटनासाठी लाडघर येथे पर्यटनासाठी आले होते. ९ वा.दरम्यान ते समुद्रात पोहायला गेले होते, १० वाजता ते पाण्यातून बाहेर आले व त्यांनी नाष्टा केला. मयूर चिखलकर वय २७ हा दुपारी सव्वातीन च्या सुमारास कपडयाना वाळू लागल्यामुळे तो ती धुण्यासाठी एकटाच समुद्राच्या पाण्यात गेला, बराच वेळ झाला तरी तो हे मित्र थांबले होते बराच वेळ न आल्याने, रुपेश गाडे हा त्यांचा मित्र मयूरला शोधायला किनाऱ्यावर गेला, त्याला मयूर वाळूवर पडलेला दिसला, त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होता, रुपेशने सर्व मित्रांना तेथे तात्काळ बोलावले, मित्रानी मयुरचे पोट दाबून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेथील ग्रामस्थांना जवळ हॉस्पिटल कोठे आहे याची विचारणा या पर्यटकांनी केल्यावर त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची माहिती मिळाल्यावर त्यांनी मयुरला गाडीतून उपजिल्हा रुग्णलयात आणले तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतम राऊत यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, पोस्ट मार्टम रिपोर्ट मिळल्यावरच ते कळू शकणार आहे. जयेश वाडेकर यांनी यासंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अजित गुजर करत आहेत.
www.konkantoday.com