
लाईट बिल भरले नाही असे सांगून याद्वारे सायबर चोरट्यांकडून ४६००० ची फसवणूक, खेड येथील प्रकार
खेड भरणे येथील राहणारे आदेश अनंत भोसले यांना अज्ञात इसमाने फोन करून तुमचे लाईटचे बिल भरण्यात न आल्याने लाईट तोडण्यात येईल असे सांगून एक ॲप डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातील 46 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे
यातील फिर्यादी आदेश भोसले यांना यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप अज्ञात व्यक्तीने तुमचे गेल्या महिन्याचे लाईट बिल अपडेट न झाल्याने तुमचे इलेक्ट्रिकचे कनेक्शन रात्री तोडण्यात येणार आहे असा व्हाट्सअप करून ते बिल अपडेट करायचे असेल तर एनी डिस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले त्यानंतर फिर्यादीला पेंडिंग बिल भरण्यासाठी फिर्यादीच्या फेडरल बँक खेड शाखेच्या अकाउंट मधून 46 हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली
सायबर गुन्हेगारांकडून विविध माध्यमे वापरून लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार जिल्ह्यात याआधी घडल्या असून पोलिसांनी त्याबाबत जागृत राहण्याचे आवाहन करूनही असे प्रकार घडत आहेत
www.konkantoday.com