अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चालवली बुलेट; पाठी बसले उमेश कुळकर्णी

भाजपातर्फे दुचाकी फेरीला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीत प्रथमच दौरा काढला. यामध्ये त्यांच्या स्वागतासाठी आयोजित दुचाकी फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला. या फेरीत चक्क आमदार बावनकुळे यांनी स्वतः बुलेट चालवली. मारुती मंदिर येथून जयस्तंभ येथील रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयापर्यंत त्यांनी दुचाकी फेरीचा आनंद घेतला. त्यांच्या मागे बसले भाजपाचे तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हेल्मेटसुद्धा घातले आणि नियमात गाडी चालवली.

प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे हे कोकणकन्या रेल्वेने येत होते. परंतु रेल्वेच्या तांत्रिक कारणामुळे त्यांना रत्नागिरीत येण्यास विलंब झाला तरीही त्यांनी नियोजित सर्व कार्यक्रम पूर्ण केले. मारुती मंदिर येथून आयोजित दुचाकी फेरीच्या सुरवातीला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशा पथकाने गजर केला आणि मारुती मंदिर परिसर दणाणून गेला. बुलेट गाडीचे सारथ्य उमेश कुळकर्णी करणार होते. परंतु दुचाकी फेरीला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून स्वतः प्रदेशाध्यक्षांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सांगितले मी गाडी चालवणार व उमेश कुळकर्णी त्यांच्या मागे बसले. कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दुचाकी फेरीमध्ये सुरवातीला महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या. त्या पाठोपाठ युवा मोर्चा आणि विविध मोर्चांचे व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. फेरीमध्ये महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्यासह, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अॅड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, राजीव कीर, राजन फाळके, दादा ढेकणे, लिलाधर भडकमकर, मानसी करमरकर, तनया शिवलकर, शिल्पा मराठे, पल्लवी पाटील, श्रद्धा तेरेदेसाई, सोनाली आंबेरकर, सत्यवती बोरकर, समीर तिवरेकर, ओंकार फडके, स्नेहा चव्हाण, संपदा तळेकर, मनोज पाटणकर, राजू भाटलेकर, उमेश खंडकर आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी फेरीचे नियोजन राजू तोडणकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, संदीप सुर्वे, नितीन जाधव, संदीप रसाळ, ऐश्वर्या जठार आदींनी केले. दुचाकी फेरीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button