रत्नागिरी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट,राष्ट्रवादीचे माजी गटनेते सुदेश मयेकर यांनी आवाज उठविला
रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या कामांनाच वर्कऑर्डर दिली जात आहे. अन्य कामे थांबली असून, झालेल्या अनेक कामांची मोठी देय रक्कम आहे. त्यामुळे शहराचा विकास सध्यातरी खुंटला असून पालिकेवर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी गटनेते सुदेश मयेकर यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे आदा झालेली देयके आणि प्रलंबित देयके याबाबत व पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद, झालेल्या खर्चाची माहिती मागवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पालिकेला दिले आहे.
पालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच वर्षभर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. प्रशासनाच्या कालावधीमध्ये पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामे घेण्यात आली. अर्थसंकल्पातील तरतुदींचा विचार करता ही कामे घेण्यात आली. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. www.konkantoday.com