
लोटेतील बंद कारखान्यातून तीन कोटींचे साहित्य चोरले; खेड पोलिस ठाण्यात आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यातून दि. 30 नोव्हेंबर 2019 ते दि. 15 डिसेंबर 2019 रोजीच्या मुदतीत सुमारे तीन कोटी रुपयांचे साहित्य चोरल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपन्यांतील भंगार चोरी होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वैभव विलास आंब्रे (37, रा.लोटे गावठाणवाडी, खेड) यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, दि. 30 नोव्हेंबर 2019 ते दि.15 डिसेंबर 2019 रोजी च्या मुदतीत संशयित आरोपी 1) विश्वास एन्टरप्रायजेस मो. नं 7722047851,9822134391 असे नंबर असलेल्या क्रेनचा चालक मालक नाव पत्ता माहित नाही. 2) ट्रकचा क्रमांक एम. एच 12 इक्युव 9471 चा चालक मालक नाव पत्ता माहीत नाही, 3) ट्रकचा क्रमांक एम. एच 50 / 1487 चा चालक मालक नाव पत्ता माहित नाही 4) हेव्हील लिफ्टर मो.नं 7397019444 या क्रेनचे चालक मालक नाव पत्ता माहित नाही, 5) ट्रकचा क्रमांक एम. एच 08 एच 0987 चा चालक मालक नाव पत्ता माहित नाही, 6) मुन्ना सिंग (रा. लोटे), 7) आसिफ मेमन (रा. चिपळुण), व 8) अन्य स्थानिक पुढारी लोटे यांनी संगनमताने लोटे औद्योगिक वसाहतीमधील 1) प्लॉट नं सी / 41 इंडी ड्युट मेटॉलो केमिकल्स प्रा. लि व 2) प्लॉट नं सी / 42 मिशाल झिंक डंड्रस्टिज प्रा. लि या दोन बंद कंपन्याचे साहित्य स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने दोन्ही कंपनीच्या इमारतीची तोडफोड करुन कंपनीतील मशिनरी व इतर लोखंडी साहित्य गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन ट्रकमिध्ये भरुन चोरुन नेले आहे.
या साहित्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असून त्यामध्ये मोठे लोखंडी चॅनेल, लोखंडी ट्रॅक, रिअॅक्टर बॉयलर, लोखंडी चिमण्या, कंपनीच्या मशिनरी, लोखंडी शेड, लोखंडी भट्टी, लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर कंपनीच्या जुन्या साहित्याचा समावेश आहे, असे श्री. आंब्रे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांविरुदध गुन्हा दाखल केला आहे.