रत्नागिरी जेलनाका येथे जलवाहिनी फुटली
रत्नागिरी : शहरातील जेलनाका येथे पुन्हा एकदा अंतर्गत जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून बाजारपेठ परिसरात नळाद्वारे जाणार्या पाण्याला मातीचा वास येत आहे. चार दिवसांपूर्वीच याठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली होती.
जेलनाका येथे सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी रस्त्याखालून गेलेली जलवाहिनी फुटली होती. नवीन योजनेतील जलवाहिनी अंथरताना जलवाहिन्यांचे जोड योग्यरित्या जोडले गेले नसल्याने शहरात कुठेना कुठेतरी हे जोड तुटत आहेत. ही दुरूस्ती करताना रत्नागिरी नगर परिषदेचा पाणी विभाग मेटाकुटीला आला आहे.चार दिवसांपूर्वी दुरूस्ती केलेल्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. दुरूस्ती करण्यासाठी रस्ता खोदावा लागला. दुरूस्तीनंतर तेथेच भराव करण्यात आला. परंतु येथून वाहनांची ये-जा होत असल्याने माती दबली जावून पुन्हा जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून बाजारपेेठेत पुरवल्या जाणार्या पाण्याला मातीचा वास येत आहे.