
जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये मॅक्रो कॅटेगरीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील आदित्य श्रीरंग भट या युवकाने प्रथम क्रमांक मिळविला
जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये मॅक्रो कॅटेगरीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील आदित्य श्रीरंग भट या युवकाने प्रथम क्रमांक मिळविला. डॅमसेलफ्लाय कीटने पाय कुरतडतानाचा फोटो काढला होता. त्याला २ लाख ६० हजार फोटोमधून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
आदित्य भट याला टोळेबंदीच्या काळात मोबाईलद्वारे फोटो काढण्याचा छंद लागला. त्यातून त्याने अनेक चांगले चांगले फोटोे परिसरातील जंगलभागात जावून काढले होते. त्यानंतर कॉलेज जीवनात वडिलांना हॉटेल व्यवसायात मदत करीत असताना फावल्या वेळात फोटोग्राफीचा छंद त्याने जोपासला. अनेक स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला होता. जागतिक रेकॉर्ड स्पर्धेत एका मिनिटात १६३ फोटो काढून प्रथम क्रमांक मिळविला होता. शाओपीने आयोजित केलेल्या जागतिक मोबाईल फोटोगफिी स्पर्धेत त्याने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमाक मिळाला. या स्पर्धेमध्ये १९१ देशांतून दोन लाख ६० हजार फोटो आले होते. त्यामध्ये आदित्य याच्या फोटोला प्रथम क्रमांक मिळाला.
या संदर्भात आदित्य भट म्हणाला, टाळेबंदीच्या काळात मिळालेला वेळ व त्या वेळेचा योग्य तो उपयोग करण्याचा मानस तयार झाला. त्यातूनच छंद म्हणून असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून फोटोग्राफीला सुरूवात केली. आपल्या कलेला वाव मिळावा यासाठी प्रयत्न करत असताना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतो.
www.konkantoday.com