कोकणातील समुद्रकिनारे फुलले सिगल पक्षांच्या थव्यांनी
देशाच्या सीमेवरील लडाखच्या प्रदेशामध्ये आढळणार्या सिगल पक्षांसह अन्य परदेशी पक्षी कोकणातील किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून अवतरले आहेत. लाडभडक चोच, पांंढरेशुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या पक्षांच्या थव्याने किनारपट्टीवरील समुद्रकिनारा फुलून गेला आहे. या पक्षांच्या किलबिलाट आणि गोंगाटाने परिसर गजबजून गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सागरी किनारपट्टीवरील सिगल पक्षांच्या वास्तव्यामुळे निसर्गसंपदेसह निसर्गसौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे. देशाच्या सीमेवरील लडाख प्रदेशामध्ये मुख्यत्वेकरून आढळणारा सिगल पक्षी गेल्या काही वर्षामध्ये थंडीच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर वास्तव्याला येतो.
थंडीच्या कालावधीमध्ये लडाख प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पडणार्या बर्फामुळे या कालावधीमध्ये या पक्षांना पुरेसे खाद्य मिळत नाही. अशावेळी ज्या परिसरात खाद्य मिळणे शक्य आहे किंवा वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरामध्ये हा पक्षी आढळतो. www.konkantoday.com