लोटेतील आगीत भाजलेल्या आणखी एका कामगाराचा मृत्यू
खेड : लोटे येथील डिव्हाईन केमिकल्स कंपनीमधील स्फोटामध्ये भाजलेल्या आठ कामगारांपैकी संदीप गुप्ता पाठोपाठ शुक्रवारी दि.१८ रोजी मध्यरात्री विपल्य मंडल या भाजलेल्या कामगाराचा मुंबई येथील ऎरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला असून अन्य सहा कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत.
डिवाईन केमिकलमध्ये रविवारी दि.१३ रोजी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आठ कामगार होरपळले होते. त्यापैकी संदीप गुप्ता याचा दि.१४ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर त्या पाठोपाठ त्याच रुग्णालयात विपल्य मंडल या आणखी एका कामगाराचा शुक्रवारी दि.१८ रोजी मृत्यू झाल्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.