
खेडमध्ये लाखो लिटर पाणी वाया
खेड ः शहरातील एलपी इंग्लिश स्कूलनजीक असलेल्या शहर पाणी पुरवठा टाकीच्या मुख्य व्हॉल्वमध्ये मंगळवार दि.20 रोजी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. खेड शहरातील एल. पी. शाळेजवळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेची सुमारे 5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या व्हॉल्वमध्ये मंगळवार दि.20 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्या व्हॉल्वमधून पाण्याचा मोठा फवारा उडून लाखो लिटर पाणी वाया गेले. या टाकीपासून सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातील खेड बसस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर व टाकी समोरील पालिकेच्या कर्मचारी वसाहत परिसरात पाण्याचे लोट वाहत गेले. शहरातील अंतर्गत मार्गावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली. मंगळवार दि.20 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खेड नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी महाडनाका परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्रपणे 5 लाख लिटर पाण्याची टाकी एल. पी. इंग्लिश स्कूलजवळ बांधली आहे. लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे महाडनाका परिसरात त्यामुळे पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. एलपी इंग्लिश स्कूल आणि मुख्याधिकारी निवास सामोरील रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. गटारांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे पाट वाहून गेले.