
रत्नागिरीत ट्रकच्या बॅटर्या चोरणार्यांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : ट्रकच्या बॅटर्या चोरणार्या संशयितांना न्यायालयाने गुरुवारी 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. किर्तीनगर येथे पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या बॅटर्या चोरण्यात आल्या होत्या. या प्रकरणी जिशान सर्फराज शेख (वय 19, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) आणि मजीद कासम नाईक (वय 33, मूळ राहणार सौंदळ राजापूर, सध्या रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांना अटक करून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अजय बाळकृष्ण सक्रे (वय 42, रा. कामेरकरवाडी, संगमेश्वर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी यातील साक्षिदार दिलीप रुपसिंग राठोड (रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांनी ट्रक (एमएच-08-डब्ल्यू-8949) हा किर्तीनगर एसटी स्टॉपजवळ पार्क करून ठेवलेला होता. रात्री दोन बॅटर्या चोरून नेल्या. याप्रकरणी दोघांना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले.