बसणीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला झुडपात
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथील गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह गुरुवारी दुपारी 1.30 वा. बसणी भोवारीवाडी येथे स्मशानभूमीजवळच्या झाडीत आढळून आला. मंदार मोहन गवाणकर (वय 45,रा. भोवारीवाडी बसणी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ हर्षद मोहन गवाणकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंदार गवाणकर यांना दारुचे व्यसन होते. शनिवार 12 नोव्हेंबर रोजी घरी न परतल्यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली होती. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.