संपर्क युनिक फाउंडेशन चे अध्यक्ष शकील गवाणकर यांना राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शकील गवाणकर गेली 25 वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत, मुक्त पत्रकार म्हणून ते गेली 30 वर्षे काम करीत आहेत, महाविद्यालयापासून त्यांना सामाजिक चळवळीत काम करण्याची आवड होती, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या सातत्याने सामाजिक कार्य करणा-या संस्थेचे ते अध्यक्ष असून, साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतः चे एक पुस्तक ही लिहून प्रसिद्ध केले.या सर्व कामगिरीची दखल घेत अहमदनगर जिल्ह्यातील दोस्ती फाउंडेशन च्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार 2022 जाहीर झाला असून हा पुरस्कार 4 डिसेंबर 2022 रोजी व्ही.आय.पी.गेस्ट हाउस, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.महाराष्ट् राज्यातून काही निवडक सामाजिक कार्य करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला हा योगायोग मानावा लागेल. असा हा मानाचा पुरस्कार रत्नागिरी शहरातील शकील गवाणकर यांना जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com