संगमेश्‍वर-देवडे गावच्या सुकन्येचा दिल्लीत झेंडा


संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा कदम हिने दिल्ली येथे झालेल्या 50 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन ब्राँझ पथकाची कमाई करत दिल्लीत झेंडा फडकाविला आहे. आपल्या गावाबरोबरच तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
17 वर्ष वयाची असणारी आकांक्षा ही वरिष्ठ पातळीवरील कॅरम स्पर्धेत भाग घेऊन नामवंत खेळाडूंना हरवून आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे आकांक्षा ही सिनिअर गटात खेळणारी सर्वात लहान खेळाडू म्हणून सहभागी झाली होती. ती सध्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून खेळाडू म्हणून खेळत असून तिने देशात वैयक्तिक ब्राँझ पथक मिळविले असून संघाला देखील ब्राँझ पदक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.
आकांक्षा हिने या स्पर्धेत उत्तर प्रदेशची ममता कुमारी, चंदीगडची सानिया, निधी गुप्ता व कर्नाटकची शायनी तसेच महाराष्ट्राची नीलम या नावाजलेल्या कॅरमपटूंचा पराभव करून विजय संपादन केला आहे.
आतापर्यंत आकांक्षा ही ज्युनिअर गटातून सहा वेळा नॅशनल खेळली असून या स्पर्धेत तिला दोन गोल्ड, दोन सिल्व्हर व दोन ब्राँझ अशी सहा पदके मिळाली आहेत. आकांक्षा हिने कमी वयात कॅरममध्ये  चमकदार कामगिरी केली आहे.  मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरूखकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपले भविष्य तिने उज्ज्वल केले आहे.  
तिच्या या यशात कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. केदार, यतीन ठाकूर, तिचा मामा आणि आंतरराष्ट्रीय कॅरमपटूसंदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, भाऊ यश, आई-बाबा आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम  असोसिएशनचे सर्व पदाधिकारी  यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल आकांक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button