लोटे येथील डीवाईन केमीकल कंपनीतील वेल्डींग स्फोटाप्रकरणी मालकासह मुलगा व वेल्डींग करणार्यांवर गुन्हा दाखल
खेड-लोटे येथील डीवाईन केमिकल कंपनीत वेल्डींगचे काम करीत असताना तेथील उडालेल्या ठिणग्या तेथे कंपनीमध्ये तयार करण्यात आलेल्या केमिकल प्रोडक्टसवर पडून आग लागल्याने त्यामध्ये आशिष मोरया, विपल्य मंडळ, संदीप परवेज उर्फ सावा गुप्ता, दिपक महाडीक, सतीश मौर्य, मयुर खाके, विनय मौर्य, दिलीप शिंदे, हे गंभीर जखमी झाले होते व त्यांच्यावर उपचार सुरू असताना जखमींपैकी संदीप परवेज उर्फ गुप्ता (रा. झारखंड) हा मुंबई ऐरोली येथे उपचार सुरू असताना मयत झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कंपनीचे मालक श्रीमती अनुराधा मौर्य, कंपनीचे काम करणारा त्यांचा मुलगा पियुष मौर्य व वेल्डींग वर्क मुकादम दीपक महाडीक यांच्याविरूद्ध योग्य ती खबरदारी न घेता हयगयीचे वर्तन करून बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३.११.२०२२ रोजी लोटेमधील डीवाईन केमिकल कंपनीत दुसर्या मजल्यावरील स्टोअरेज रूममध्ये घडला होता. www.konkantoday.com