महावितरणाचे ऍप डाऊनलोड करायला सांगून तरूणाची ३० हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी सह्याद्री नगर नाचणे येथील राहणारे स्वप्नील सुभाष कांबळे या २४ वर्षीय तरूणाची ऑनलाईन फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. महावितरणचे ऍप डाऊनलोड करायला लावून तरूणाच्या खात्यातील ३० हजार रुपये अज्ञात इसमाने काढून घेतल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. मुळचा धामणी बौद्धवाडी संगमेश्वर येथे राहणारा स्वप्नील कांबळे हा रत्नागिरी -नाचणे रोड येथे नोकरीनिमित्त राहतो. त्याला अज्ञात इसमाचा फोन आला व त्याने महावितरणचे ऍप व एनीडेक्स एक लाल रंगाचा ऍप फिर्यादीकडून अपडेट करून घेतला त्यानंतर फिर्यादीचा आलेला ओटीपी नंबर घेवून फिर्यादीच्या सारस्वत बँकेच्या खात्यातून ३०,८६९ रुपये लबाडीने काढून घेवून त्याची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वप्नील याने शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.www.konkantoday.com