जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि आरपीआय या सर्व पक्षांची मोट बांधण्याचा माझा प्रयत्न -आमदार भास्कर जाधव
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर काम करण्यासाठी वेळ आली तर पुढाकार घेईन, असे सांगत जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि आरपीआय या सर्व पक्षांची मोट बांधण्याचा माझा प्रयत्न आहे, असे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासदार तटकरे आणि आमदार जाधव एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र वेळ आली तर तशी भूमिका घेऊ. त्याहीपुढे जाऊन आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आरपीआय असा भेदभाव न करता सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने आपापल्या ताकदीने अपेक्षा ठेवल्या तर सगळ्यांना गोळा करण्याचा मानस आहे. शिवसेनेच्या नेत्यांना येथील वस्तुस्थिती सांगण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी माझ्याबरोबर अन्य नेते आले तर ताकद निश्चितच वाढेल पण ते आपल्या जिल्ह्यात अडकून पडले तरीही रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढाकार घेणार आहे.
www.konkantoday.com