किरकोळ भांडणातून तरुणाने केले विषप्राशन
खेड :सातारा येथील एका तरुणाने किरकोळ भांडणानंतर रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. त्यामूळे त्याचा मृत्यु झाला. दीपक बाबुराव जाधव (30, करंजोशी, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील किंजळे तर्फ खेड येथे दि. 14 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद दाखल करून अधिक तपास सुरू आहे.