
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचेअध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचा राजीनामा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागातील काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी मंडळाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे.
याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा दिल्याचेही समजते.
‘मंडळ’ हे नामाभिधान बदलून त्याचे ‘साहित्य संचालनालय’ असे नामकरण करण्याचा मानस असल्याचे समजते. मंडळाचे रूपांतर सरकारी खात्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय मंडळाची संरचना बदलण्याचे, उद्दिष्टे बदलण्याचे प्रयत्न काही अधिकारी करत असल्याची चर्चा आहे.
www.konkantoday.com