परशुराम घाट पुन्हा बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध, वाद चिघळणार

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह माती भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरू आहे. प्रशासन लवकरच याबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. परंतु परशुराम घाटातील वाहतूक पुन बंद करण्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. घाट पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थी, शेतकरी तसेच नोकरदारांनी काय करायचे असा सवालही विचारला जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button