पंचवीस लाख खर्चून बांधलेल्या गोविंदगडाच्या पायर्यांना गेले तडे
चिपळूण : गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायर्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अवघ्या महिनाभरात या पायऱ्यांना तडे गेले आहेत तर काही ठिकाणी बांधकामही ढासळले आहे.
याबाबत काही ग्रामस्थ्यांच्या तक्रारीनंतर शुक्रवारी सुरेश कदम, किरण बांद्रे यांनी या पायर्यांची पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. दुरवस्था झालेल्या या पायर्यांच्या कामासाठी आ. निकम यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजनमधून निधी तत्काळ मंजूर केला. सुमारे 25 लाख रुपयांचे हे काम आहे. सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाली. सुरवातीला काही पायर्यांचे काम चांगले झाले. परंतु कालांतराने हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. गोविंदगडाच्या प्रवेशद्वारापासून हे काम सुरू करण्यात आलेले नाही. तर पुरेसे पाणी नसल्यामुळे पायर्यांच्या कडा तुटल्या आहेत, तर काही पायर्यांचे सिमेंट निखळले आहे.
दरवर्षी शिमगा उत्सवामध्ये अवजड पालख्या गडावर नेल्या जातात. त्यामुळे पायर्यांचे टप्पे कमी उंचीचे व एकसारखे असणे अपेक्षित असताना पूर्वीच्या पायर्यानुसारच संबंधित ठेकेदाराने बांधकाम केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
आहे. काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष ठेकेदाराशी संपर्क साधल्यानंतर समर्पक उत्तर देण्यात आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com