खासदार सुनील तटकरे म्हणतात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता
रत्नागिरी : भविष्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. रत्नागिरीत आलेल्या खा. सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक सुदेश मयेकर, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे उपस्थित होते.
यावेळी खा. तटकरे म्हणाले, आ. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत दाखल केलेला गुन्हा हा निषेधार्ह आहे. एखाद्याचा आवाज दाबण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण सुरु झाले आहे. आ. आव्हाड यांच्याबाबत जो प्रकार घडला त्यावेळी मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. ते असताना झालेली ही कारवाई चुकीची आहे. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत. आ. आव्हाड यांच्याविरोधात सुडाचे राजकारण केले जात असल्याची टीकाही खा. तटकरे यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेलाही ‘मविआ’ने एकत्र लढावे अशी कार्यकर्त्यांची व पदाधिकार्यांचाही मतप्रवाह असल्याचे खा. तटकरे यांनी त्यांनी सांगितले.