
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिकांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ व्यासंगी साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच २ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com