चिपळूणचे सुपुत्र मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती पदक

चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व सध्या मुंबई अंधेरी साकीनाका पवई येथे सहायक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असलेले मिलिंद भिकाजी खेतले यांना त्यांच्या पोलीस सेवेतील कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.याबद्दल सर्वत्र कोकणातून त्यांचे अभिनंदन होत आहे. खेतले हे १९८७साली पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले होते.आपली जबाबदारी व कर्तव्य योग्य रीतीने पार पाडत ते सहायक आयुक्त पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यांत आले आहे. त्यांचे वडील भिकाजी खेतले हे देखील पोलिस सेवेत होते व त्यांना सुद्धा १९९४ साली राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button