शेती पंपाची वीज बिले भरमसाठ
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील सर्व शेतकर्यांना म्हणजेच आंबा, काजू, बागायतदार, रोपवाटिकाधारक, फणसबाग, नारळ सुपारीच्या बागा, सर्व प्रकारची अंतर्गत पिके व इतर सर्व प्रकारची अंतर्गत पिके व इतर सर्व हॉर्टीकल्चर, ऍग्री यांना असलेल्या पंपाची प्रचंड वीजबिले येत आहेत. कारण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने काही वर्षापूर्वी अचानक न सांगता टेरीफ बदलले असून ऍग्रीचे ऍग्री अदर, पोल्ट्री असे विविध उप विभाग करून फक्त आणि फक्त कोकणात भरमसाठ वीजबिले वाढवली आहेत. त्यामुळे तत्काळ शेतकरी, बागायतदारांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे हरकती, अभिप्राय, सूचना पाठवाव्यात असे आवाहन समृद्ध कोकण चळवळीतील कार्यकर्ता ऍड. ज्ञानेश पोतकर यांनी केली आहे. www.konkantoday.com