लोटेत आगीत भाजलेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक; दुर्घटनेच्या तपासासाठी पथके

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या डिव्हाईन कंपनीमध्ये रविवारी दि. १३ रोजी लागलेल्या आगीत आठ जण भाजले. या कामगारांपैकी तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व आगीत होरपळलेल्या कर्मचाऱ्यांवर ऐरोली मुंबई येथील बर्न हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तसेच केमिकल कंपनीमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर तसेच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे उपसंचालकांचे पथक कंपनीत दाखल झाले असून या दुर्घटनेच्या तपासाला त्यांनी सुरुवात केली आहे. घटनास्थळी रत्नागिरी पोलिसांच्या राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या देखील बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button