राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची रत्नागिरीत भेट झाली . तब्बल तासभर चाललेल्या बैठकीत कोणत्या विषयासंदर्भांत चर्चा झाली याबाबत दोन्ही नेत्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय याची चर्चा सुरू झाली आहे
राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या. मात्र, आपण ठाकरे गटातच राहणार असून शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भूमिका राजन साळवी यांनी स्पष्ट केली होती. त्यानंतर ते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध कार्यक्रम आणि बैठकीत दिसले. मात्र, दुसरीकडे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्यासोबत राजन साळवी यांची भेट झाली. सध्या कोकणात अनेक विषय प्रलंबित आहेत. कोकणाचा विकास, रिफायनरी प्रकल्प याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली कीअन्य विषयांवर हे कळलेले नाही
www.konkantoday.com