मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी खेडमध्ये
खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि.१५ रोजी कोकणात खासगी दौऱ्यावर येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खेड तालुक्यातील तळे येथे ते येणार असून याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. ते कौटुंबिक भेट देणार असल्याचे समजते. या दौऱ्यामुळे पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.