मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला पत्तन विभागाने दिला दुसरा दणका

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला पत्तन विभागाने दुसरा दणका दिला आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याचे वर्षभरात अपेक्षित काम न झाल्याने १८ लाख ८० हजाराचा दंड करण्यात आला आहे. नुकताच हा प्रस्ताव पत्तन विभागाच्या मुख्य कार्यालयाने मंजूर केल्याचे पत्तन विभागाने सांगितले. त्यानंतर ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत काम सुरू न केल्याने दुसऱ्यांदा १८ लाखाचा दंड केला आहे. पत्तन विभागाने आतापर्यंत ३७ लाखाचा दंड ठेकेदाराला केला आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणारा पत्तन विभाग यावर लक्ष ठेवून आहे. कामासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. हे काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे यासाठी पत्तन विभाग या कामावर लक्ष ठेवून आहे. तरी या कामला अपेक्षित गती मिळालेली नाही. मिऱ्या गावाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे साडेतीन किमीच्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. मिऱ्यावासियांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे; मात्र १० महिन्याच्या कालावधीच्या अनुषंगाने अपेक्षित काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button