
चिपळुणातील वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मृतदेह
चिपळूण : शहरातील पेठमाप परिसरात वाशिष्ठी नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. तिचे नाव सुशिला गोलांबडे (वय 70, रा. शंकरवाडी, चिपळूण) असे आहे. सोमवारी (दि.14) 1.30 वाजण्याच्या सुमारास पेठमाप भागातील रहिवाशांना नदीमध्ये मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.