
गो सेवा संघाच्या सुशिल कदम यांनी दिले घोरपडीला जीवदान
रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : निवळी गावातील उमेश रावणंग याच्या घरामध्ये एक मोठी घोरपड दिसुन आली. उमेश रावणंग यांनी तिला तासभर घराबाहेर हालवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही जात नव्हती. घरामध्ये लहान मुलं व वयोवृद्ध माणसे घाबरल्यामुळे अखेर त्यांनी गो सेवा संघाचे सुशिल कदम यांना बोलवले. सुशिल कदम आणी अमीत खटावकर यांनी २ तासांच्या प्रयत्ना नंतर घोरपडीला पकडून जिवनदान दिले .घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. उमेश रावणंग आणि त्यांच्या परिवाराने गो सेवा संघाचे आभार मानले.