
गवत कापत असताना साप चावल्याने खेरवसे येथील प्रौढाचा मृत्यू
लांजा : तालुक्यातील बेनीखुर्द येथे विषारी साप चावल्याने एका 54 वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. घडली. खेरवसे बौद्धवाडी येथील चंद्रकांत सिताराम धनावडे (54 वर्षे) हे सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बेनी खुर्द येथील आंबा बागेत गवत साफसफाई करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्या पायाला सापाने चावा घेतला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सापाला झटकले होते. आपल्याला साप चावल्याची माहिती त्यांनी नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांना तातडीने दुपारी 12.40 वाजता लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना चंद्रकांत धनावडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.