लांजा – कोर्ले मार्गावर विवली येथे मोटार सायकलची रिक्षाला पाठीमागून धडक

लांजा : मोटरसायकलने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यात रिक्षा चालकासह मोटरसायकलस्वार मिळून पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास लांजा – कोर्ले मार्गावर विवली एसटी बस थांबा या ठिकाणी घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजन गणपत शितप (वय ४३ वर्षे, रा. करबुडे, ता. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एम.एच. ०८ ए – ०६४०२) मधून करबुडे येथून भाडे घेवून लांजा तालुक्यातील विवली बौद्धवाडी येथे जात होते. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास लांजा – कोर्ले रोडवरील विवली बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही मोटरसायकल (एम.एच.०८ – एएफ ८५३३) ही घेऊन अमोल अनंत पांचाळ (२३ वर्षे, रा. खेरवसे ता. लांजा) व संतोष केशव लोटणकर (४७ वर्षे, रा. खेरवसे) हे दोघे खेरवसे इथे जात होते. या अपघातात मोटरसायकल स्वारांसह चालक राजन शितप हे देखील जखमी झाले. याबरोबरच रिक्षात बसलेले श्रावणी सुनील कांबळे (३६, रा. विवली बौद्धवाडी) तसेच त्यांची मुलगी प्रांजल सुनील कांबळे (८ वर्षे) असे एकूण पाच जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींपैकी रिक्षा चालक राजन शितप तसेच मोटरसायकलस्वार संतोष लोटणकर यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button