रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारीही डॉल्फीनचा वावर

रत्नागिरी : जयगड पाठोपाठ आता रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनारीही डॉल्फीन माशांचा कळप मुक्तविहार करताना करताना पाहायला. त्यामुळे हे डॉल्फीन पाहण्यासाठी भाट्ये समुद्रकिनारी हौशी पर्यटकांच्या गर्दीची वाढ झाली आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये सुमद्रकिनारी सकाळी आणि संध्याकाळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. हे सर्वजण डॉल्फीनचे छायाचित्रण आपल्या मोबाईलमध्ये करून घेत आहेत. दापोली समुद्रातील डॉल्फीन प्रजातीच्या माशांच्या पाण्यातील कसरती पाहण्यासाठी पर्यटक समुद्रसफर करतात. त्यानंतर जयगड समुद्रात डॉल्फीनचे दर्शन झाले होते. आता तर शहरालगतच्या भाट्ये समुद्रात मोठ्या प्रमाणात डॉल्फीनचा वावर दिसून आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button