राजापुरात महावितरणचा अजब कारभार, स्वतः ट्रान्सफार्मर उभारला आणि आता हलवण्यासाठी मागत आहेत नगरपरिषदेकडे मोबदला
एसटी आवारासमोरील नगर परिषदेच्या स्व. मीनाताई व्यापारी संकुलातील नगर परिषदेच्या मालकीचे गाळे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाडण्यात येवून त्याचलगत नव्या गाळ्यांचा न.प.चा प्रस्ताव प्रक्रियेत आहे. मात्र महावितरणच्या राजापूर कार्यालयाने या जागेदरम्यान परस्पर विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारून तो हलवण्यासाठी आता नगर परिषदेने पैसे मोजावेत, असे पत्र धाडले आहे. महावितरणच्या या बेबंदशाहीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महावितरण अशा स्वरूपाच्या बेबंद कारभाराचा फटका अनेक ग्राहकांना वैयक्तिकरित्या बसलेला आहे. अनेकांच्या खासगी जागेतून कोणताही मोबदला न देता महावितरणच्या वाहिन्या गेलेल्या आहेत. आता त्याचा थेट फटका नगर परिषदेसारख्या संस्थेला बसला असल्याचे दिसून आले आहे. www.konkantoday.com