
मंडणगडमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना तक्रार देण्याचे पोलिस अधीक्षकांचे आवाहन
रत्नागिरी : मंडणगड येथे एका कंपनीने गुंतवणूकदारांची तब्बल 76 लाख 15 हजार 815 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या कंपनीने पैशांची गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांना आमिषे, प्रलोभने, दाखवली. मागील महिन्यात या कंपनीविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून खेड, दापोली या विभागातीलही अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. याचा अधिक तपास मंडणगडच्या पोलिस निरीक्षक शैलजा सावंत तपास करत आहेत.